गीता साने - लेख सूची

जुन्या चाकोरीत फसलेली मनोवृत्ती

ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण …

भारतीय स्त्रीजीवन

अर्थार्जन करणाच्या सर्वच स्त्रिया स्वतंत्र असत नाहीत. बहुतेक कुटुंबांमधून बायकोचा पगार हा पुरुषाच्या मिळकतीचाच भाग समजला जातो. महिन्याच्या महिन्याला बायकोने आपला पगार नवर्याोच्या हातात ठेवावा, असा दंडकही या घरांत आढळतो. त्या पगारातून हातखर्चाचे पैसे आधी ठेवून घेण्याची सवड कधी बायकोला असते, तर कधी तिचा पगार हातात आल्यावर त्यातून नवरा तिला हातखर्चाचे पैसे देतो; कधी तिच्या …

पुरुषप्रधान समाजात स्त्री पुरुषाची मालमत्ता

स्त्रियांच्या चळवळीला स्पष्ट असे विधायक उद्दिष्ट नसल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कोठेही उण्या नाहीत हे दाखविण्यात स्त्रीचळवळीची बरीच शक्ती पाश्चात्य देशात खर्च होते…… भारतामधील स्त्री-चळवळी बलात्कार, नववधूच्या हत्या ह्या गंभीर गुन्हेगारीवर धार धरीत आहेत हे योग्यच असले, तरी हुंडा तसेच बलात्कार ह्या गोष्टी समाजात का घडतात व त्यांचे निर्मूलन कसे करता येईल ह्याचा विचार अजून सुरूही झालेला …

ही खरेदीविक्रीची पद्धत किती दिवस चालणार?

लग्न ही सर्वसामान्य प्रत्यही घडणारी गोष्ट आहे. मग ही खरेदीविक्रीची पद्धत अजून का नाही बंद पडत? विशेषतः शाळा कॉलेजांतून जाणाऱ्या मुलींना ‘पाहण्याची’ काय आवश्यकता आहे? आम्ही पडदानशीन थोड्याच आहोत? शाळेत जाता-येता मुलगी अव्यंग आहे की नाही हे सहज अजमावता येईल. घरी येऊन तरी चहापोहे झोडून मुलीला चारदोन मामुली प्रश्न विचारण्यापलीकडे वरपक्ष काय करतो? मुलीचे शील …

कामसूत्रे आणि स्त्री

कामसूत्रं वाचली की पुरुषाला संभोगाचे किती वेड असतं ते कळतं. माझ्या नेहमी मनात येतं, बायकांवर कोणी संभोगशास्त्र लिहिलेलं नाही. निदान इतक्या मोठ्या प्रमाणावर तरी नाही. कारण एकच दिसते, पुरुषाला संभोगाची जबाबदारी स्वीकारावी लागत नाही. क्रिया झाली की तो मोकळा होतो. त्यामुळेच मला वाटतं, त्याची लैंगिक भूक जबरदस्त असते. आणि ती भागविली गेल्यावर त्याला वारंवार मोकळेपणाचं …

विवाह संस्था आणि स्त्री

प्रश्न : विवाहसंस्था नष्ट झाली तर मुलांचा प्रश्न निर्माण होईलही; पण स्त्रियांचा तरी विकास होईल का ? गीता साने: हो, विवाहसंस्था नष्ट झाली तर स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या कमी होतील आणि विकास होईल. आज बायकांना हे करावसं वाटतं, ते करावस वाटतं, पण जमत नाही. उर्मी एकदा निघून गेली की गेली! हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्यासारख्या बाईचं …

इंग्रजी माध्यमाचा हव्यास

आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन आवश्यक असल्याची भाषा गेले एक शतक आपण केलेली आहे. या पद्धतीत स्वतंत्र भारतात… नजरेत भरणारा एक बदल पालकांनी घडवून आणला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या व त्यांच्याकडे ‘देणग्या’ देऊनही प्रवेश मिळविण्यासाठी वाहणारा पालकांचा लोंढा. तथापि धनिक व वरिष्ठ वर्गाची मुले तेथे मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या हातातच पुढे …

स्त्री असुरक्षित आहे

हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या …

सुधारणा झाल्या?

प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ …

विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती

विज्ञान आणि वैज्ञानिकवृत्ती ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षणसंस्थात अतोनात महत्त्व आलेले आहे. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात वा चटकन श्रीमंत करणारे व्यवसाय करू शकतात, …

भारतीय स्त्रीजीवन (भाग २)

गीता साने (मौज प्रकाशन, १९८६) कि. रु. २८/ गीता सान्यांच्या वरील पुस्तकाच्या परिचयलेखाचा पूर्वार्ध मे ११ च्या अंकात दिला आहे. प्रस्तुत लेख त्याच लेखाचा उत्तरार्ध आहे. पहिल्या लेखात प्रश्नाची पार्श्वभूमी आणि ‘ स्त्री आणि कुटुंबसंस्था’ या विषयांवरील लेखिकेचे प्रतिपादन आले आहे. आपल्या समाजाला समता व स्वतंत्रता ही मूल्ये पटत असतील तर आपली कुटुंबसंस्था बदलावी लागेल …